Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

ओमप्रकाश कोयटे नेतृत्वाखाली एशियन असोसिएशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यु ) च्या इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत गणेशोत्सव उत्साहात साजरा

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

ओमप्रकाश कोयटे नेतृत्वाखाली एशियन असोसिएशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यु ) च्या इंडोनेशियातील आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत गणेशोत्सव उत्साहात साजरा

दैनिक गणेश श्रध्दा न्यूज नेटवर्क पोर्टल

कोपरगांव – बाली (इंडोनेशिया) येथे असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन (ॲक्यु) या सहकारी पतसंस्थांच्या आंतरराष्ट्रीय शिखर संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या इंडोनेशिया आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत भारत देशाचे नेतृत्व करीत असलेले महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष व ॲक्युचे खजिनदार ओमप्रकाश कोयटे व सौ.सुहासिनी कोयटे यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी उपस्थित प्रतिनिधींना संबोधित कर तांनाओमप्रकाश कोयटे म्हणाले की, लहानपणापासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थी कोयटे परिवारात साजरी करण्यात येत असते. यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या निमित्ताने परदेशात आलो असता गणेश चतुर्थी कशी साजरी करावयाची ? हा प्रश्न पडला होता. मी माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने गणेश मूर्ती व आरतीचे सर्व साहित्य मिळवत जगातील ३० देशातील पाचशेच्या वर प्रतिनिधींच्या उपस्थितीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला.

आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहभागी झालेल्या सहकार उद्यमीच्या अध्यक्षा ॲड.डॉ.सौ. अंजलीताई पाटील, फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे, सहकारी पतसंस्था चळवळीतील युवा कार्यकर्ता प्रतिक काजळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सहकारी पतसंस्था चळवळीतील युवा कार्यकर्ते प्रतीक काजळे यांनी भारत देशातील गणेशोत्सव व सहकारी चळवळ यांचे नाते जगातील उपस्थित प्रतिनिधींना मनोगतातून समजावून सांगितले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे