Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

संजीवनी ग्रामीण विद्यापीठात मिळणार अभियांत्रिकी इंटिग्रेटेड डिप्लोमा व डीग्री पदवी – कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

संजीवनी ग्रामीण विद्यापीठात मिळणार अभियांत्रिकी इंटिग्रेटेड डिप्लोमा व डीग्री पदवी – कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे

बी. बी . टेक सह अन्य कोर्सेसची प्रवेश प्रक्रिया सुरू

🔥 आग न्यूज व दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगांव : संजीवनी विद्यापीठात मागील वर्षापासून  बी. टेक.(एआय, एआयएमएल, एआयडीएस, सायबर सिक्युरिटी व कॉम्प्युटर  सायन्स अँड  इंजिनिअरींग), बीबीए, बी. कॉम., एमबीए असे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले होते.

आता संजीवनी विद्यापीठ अंतर्गत स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड  टेक्नॉलॉजी मध्ये चालु शैक्षणिक वर्षापासून  इ. १० वी नंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग या अभ्यासक्रमाला प्रवेश  दिला  जाणार असुन या अभ्यासक्रमाचा कालावधी सहा वर्षांचा  असणार आहे. विद्यार्थ्यांना इंजिनिअरींगचा डीप्लोमा आणि डिग्री दोनही मिळणार आहे. विद्यापीठाच्याच प्रवेश  परीक्षेतुन प्रवेश निश्चित  केला जाणार आहे.

तसेच चालु शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठ अंतर्गत बीसीए,  एमसीए, बी.एससी (केमेस्ट्री, मायक्रोबायोलॉजी आणि फुड न्यट्रिशन), एम.एससी (केमेस्ट्री व मायक्रोबायोलॉजी) हे अभ्यासक्रही सुरू करण्यात येणार आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या अकॅडमिक बोर्ड ऑफ स्टडीजने मान्यता दिली आहे. विद्यार्थी व पालकांना प्रवेशासंदर्भात मार्गदर्शन  करण्यासाठी मार्गदर्शन  केंद्र सुरू करण्यात आले आहे, अशी  माहिती संजीवनी ग्रामीण विद्यापीठ व्यवस्थापन समिती कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे दिली आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की , डिग्री इंजिनिअरींगला प्रवेश  घ्यायचा असेल तर इ.१२ वी सायन्स करून सीईटी किंवा जेईई या प्रवेश  परीक्षा देणे अनिवार्य असते.त्यात चांगला स्कोअर असला तरच दर्जेदार इंजिनिअरींग कॉलेज मध्ये प्रवेश  मिळतो. परंतु आता संजीवनी विद्यापीठाने खुल्या केलेल्या पर्यायामुळे हे सर्व अडथळे दुर झाले असल्याची माहिती समारोपात कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे