Breaking
देश-विदेशनोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

संजीवनी ग्रामिण विद्यापीठ संलग्न संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांना एकुण १ कोटी ७७ लाख रुपयांचे पॅकेज – कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

संजीवनी ग्रामिण विद्यापीठ संलग्न संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील नऊ विद्यार्थ्यांना एकुण १ कोटी ७७ लाख रुपयांचे पॅकेज – कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे

🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगाव – संजीवनी ग्रामीण विद्यापीठ संलग्न संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांना वार्षिक पॅकेज रू २७ लाख व तीन विद्यार्थ्यांना रू २१ लाखांवर तर तिघांना एकूण ३३ लाख रुपयांच्या अशा स्वरुपात एकूण १ कोटी ७७ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजच्या नऊ विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय वित्तीय कंपनी मध्ये नोकऱ्या अशी माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे यांनी दिली.

संजीवनी ग्रामीण विद्यापीठ संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या व कॉम्प्युटर इंजिनिअरींग आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागातील शिक्षकांच्या प्रयत्नाने बहुराष्ट्रीय वित्तीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतींमध्ये तीन विद्यार्थ्यांची प्रत्येकी रू २७ लाख वार्षिक पॅकेजवर, तीन विद्यार्थ्यांची प्रत्येकी रू २१ लाख, एकाची रू १६ लाख, एकाची रू ९ लाख तर एकाची रू ८ लाख वार्षिक पॅकेजवर नोकऱ्यांसाठी निवड झाली, असे एकुण नऊ विद्यार्थ्यी कंपनीने नोकरीसाठी निवडले.

यामध्ये राहुल कैलास जगधने, वैष्णवी सचिन मोहाडकर व प्रथमेश संतोष सोनवणे यांची प्रत्येकी
वार्षिक पॅकेज रू २७ लाखांवर निवड झाली. यशोदिप सुधिर भामरे, ज्ञानेश्वरी विजयराज डोळझाके व ऋषिकेश राजेंद्र वाबळे यांची प्रत्येकी वार्षिक पॅकेज रू २१ लाखांवर निवड झाली.

तर संकेत श्रीराम दवंगे याची रू १६ लाख वार्षिक पॅकेजवर निवड झाली. प्रणव विक्रमादित्य गाडे व विनित हर्षद जोशी यांची अनुक्रमे रू ९ लाख व रू ८ लाख वार्षिक पॅकेजवर निवड झाली.

श्री कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की अनेक उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञान अवगत असलेले अभियंते मिळत नाही, तर अनेक अभियंत्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नाही, हे वास्तव संस्थेचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी जानले. ही विसंगती दुर करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासुन ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केला आणि नामांकित उद्योगांना अभिप्रेत असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश अभ्यासक्रमात केला.

त्याचा चांगला परीणाम प्लेसमेंटसाठी पहिल्या ऑटोनॉमस बॅच पासुन दिसत आहे. ग्रामिण भागातील मुला मुलींना सरकारी आस्थापना किंवा नामांकित कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात, काहींनी स्वतःचे उद्योग सुरू करून इतरांच्या हातांना काम द्यावे, या हेतुने सुमारे ४२ वर्षांपूर्वी संजीवनी शैक्षणिक संकुलाची स्थापना स्व. कोल्हे यांनी केली. त्यांची दूरदृष्टीता सातत्याने सिध्द होत आहे.

संजीवनीचे अध्यक्ष नितीन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या सर्व अभियंत्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे