Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करेल – खासदार भाऊसाहेब वाकचौरे

संपादक - अरूण आहेर

0 0 1 9 1 5

समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करेल – खासदार भाऊसाहेब वाकचौरे

 दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगांव – देशात प्रथमच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी समता इंटरनॅशनल स्कूलने समाज रोबोजिनिअस सेंटर उभारणी तून भारत देशाला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी समता रोबोजिनिअस सेंटर उभारणी तून जागतिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सुवर्णमयी ज्ञानाचे भांडार उपलब्ध करून दिल्याचे गौरवोद्गार खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी एशियन असोसिएशन ऑफ क्रेडिट कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियनचे खजिनदार व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे संचलित जागतिक पातळीवर आपल्या विविध उपक्रमातून झळकलेल्या समता इंटरनॅशनल स्कूल मधील समताज रोबोजिनिअस सेंटर उद्घाटनप्रसंगी बोलतांना काढले.

खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते ओमप्रकाश कोयटे अध्यक्षतेखाली व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ॲड. संदिप वर्पे , सामाजिक कार्यकर्ते रोहित वाकचौरे आदी प्रमुख पाहुण्यांचे उपस्थितीत समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये समताज रोबोजिनिअ सेंटर उद्घाटन करण्यात आले.
प्रारंभी समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ. स्वाती कोयटे यांनी प्रास्ताविकातून समता इंटरनॅशनल स्कूलच्या दिवसेंदिवस उंचावत असलेल्या प्रगतीच्या आलेखाविषयी माहिती देत, समता इंटरनॅशनल स्कूल हे जगाला गवसणी घालणारे ज्ञानपीठ बनले आहे. यामुळे समताचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवत असून परदेशातही आपला ठसा उमटवत असल्याने भविष्यातही समताचा विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच नवनवीन तंत्रज्ञानाचा परिपाक असेल. अशी ठाम ग्वाही दिली.तसेच कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे यांनी विद्यार्थ्यांना बचत ठेव योजनेविषयी माहिती देतांना बचतीचे महत्त्व समजावून सांगितले.

प्राचार्य डॉ.विनोद चंद्र शर्मा यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून परिचय करून दिला. कार्यक्रमाच्या पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते करण्यात आला. अक्षत मिश्रा या विद्यार्थ्याने मनोगतातून रोबोचे महत्त्व सांगितले. ईशान कोयटे, इप्सिता राय, द्रिष्टी लोकचंदानी, कलश बागरेचा, रणवीर मांजरे, श्रीनिवास मोरे, हासीम शाद या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने रोबोविषयी प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देशना अजमेरा व दृष्टी ठाकूर यांनी केले तर उपस्थितांचे आभार धनश्री पोरवाल हिने मानले.

या प्रसंगी समता इंटरनॅशनल स्कूलच्या शालेय व्यवस्थापन समितीने समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून समताच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानदा बचत ठेव योजने’ चा शुभारंभ करण्यात आला आहे. बाल वयातच बचतीची सवय विद्यार्थ्यांना व्हावी. यासाठी ज्ञानदा बचत ठेव योजनेचा पिग्गी बॉक्स प्रमुख पाहुण्यांचे शुभ हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे