Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे शिष्टाईस यश ; देशातील पतसंस्थांच्या विविध करासंबंधित प्रश्नांसाठी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासमवेत नवी दिल्लीत बैठक – केंद्रीय सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे व महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे शिष्टाईस यश ; देशातील पतसंस्थांच्या विविध करासंबंधित प्रश्नांसाठी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांच्यासमवेत नवी दिल्लीत बैठक – केंद्रीय सहकार राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहोळ

गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगाव : देशातील सहकारी पतसंस्थांना भेडसावत असलेल्या केंद्रीय पातळीवरील विविध समस्या सोडवण्यासाठी लवकरच केंद्रीय अर्थराज्यमंत्री मा.पंकज चौधरी यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा केंद्रीय सहकार राज्यमंत्री मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रवरा नगर येथे महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे, माजी खासदार डॉ सुजय विखे, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, राहाता तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे व संचालक स्वाधीन गाडेकर आदींचे उपस्थितीत राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीविषयी यावेळी सविस्तर चर्चा झाली.

याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मोहोळ यांनी पद्मश्री सहकार जनक स्व. विठ्ठलराव विखे पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी चार पिढ्यांपासून सहकार चळवळ सशक्त ठेवली असून त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी केलेल्या शिफारशी पूर्ण करण्याचे वचन मी आज सहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या प्रवरा नगरीत ग्वाही दिल्यानंतर आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी
देशातील पतसंस्थांवर अन्यायकारक कर आकारणीचा मुद्दा मांडताना देशातील आयकर कायद्याच्या कलम 80P अंतर्गत सहकारी पतसंस्थांना कर सवलत असूनही त्यांच्यावर कर आकारला जातो. तसेच सहकारी बँकांतील गुंतवणुकीवर टीडीएसही आकारला जातो, जे चुकीचे आहे. जेव्हा कर लागू होत नाही, तेव्हा टीडीएसचा प्रश्नच उद्भवत नाही.”

या भूमिकेला केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच आयकर कायद्याच्या कलम 269 एसओटी अंतर्गत दोन लाखांपेक्षा अधिक रक्कम स्वीकारण्यावर असलेल्या निर्बंधावरही पुनर्विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याशिवाय पतसंस्थांना सिबिल स्कोअरमध्ये समाविष्ट करणे, क्लिअरिंग हाऊसचे सभासदत्व व यूपीआय अ‍ॅक्सेस देण्यासंदर्भातही केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे आश्वासन नामदार मोहोळ यांनी दिले.

ही भेट मा. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त झाली. ही भेट घडवून आणण्यात अहिल्यानगर जिल्हा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या माध्यमातून ही महत्त्वपूर्ण बैठक घडून आणल्याबद्दल राज्यातील सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीने राहाता तालुका फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र वाबळे व संचालक स्वाधीन गाडेकर यांनी त्यांचे आभार मानले.

1/5 - (1 vote)

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे