केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमित शहा , महाराष्ट्र राज्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी अमेरिका ,थायलंडसह ८ देश,४ राज्यांतील सहकारी पतसंस्थांच्या तीस हजार प्रमुख प्रतिनिधींच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री आणि सहकार परिषद स्वागताध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन चे खजिनदार , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ऑफ अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली ८ व ९ फेब्रुवारी २०२५ ला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेत महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींनी सहभाग नोंदवावा – कार्याध्यक्ष वसंत कवाद
संपादक - अरुण आहेर

केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमित शहा , महाराष्ट्र राज्य मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी अमेरिका ,थायलंडसह ८ देश,४ राज्यांतील सहकारी पतसंस्थांच्या तीस हजार प्रमुख प्रतिनिधींच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री आणि सहकार परिषद स्वागताध्यक्ष नामदार राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन चे खजिनदार , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ऑफ अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखाली ८ व ९ फेब्रुवारी २०२५ ला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिषदेत महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींनी सहभाग नोंदवावा – कार्याध्यक्ष वसंत कवाद

दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगाव : आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व देशांचे जागतिक पातळीवर नेतृत्व करणाऱ्या युनो संघटनेंने सन २०२५ हे वर्ष जागतिक सहकार वर्ष पाळून सहकार क्षेत्रातील विश्वासहर्ता व सबलीकरण मजबूत करण्याचे उपक्रम राबविण्याचे सर्वं देशांना आवाहन केले आहे . या आवाहनास प्रतिसाद देण्यासाठी केंद्र सरकारने पूर्ण वर्षभर सहकार सुद्दूढ व विश्वासार्ह बनविण्यासाठी देशात विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारविभाग , एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था महाराष्ट्र राज्य मल्टी स्टेट सहकारी पतसंस्था फेडरेशन , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था स्थैर्य निधी फेडरेशन यांच्या संयुक्त सहभागातून राज्यभर सहकारी पतसंस्था विश्वासहर्ता आणि पतसंस्थांचे सर्वांगीण अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित सबलीकरण आदी उपक्रम राज्य , जिल्हा ते गावपातळीवर राबविले जाणार आहे.

या मोहिमेची मुहूर्तमेढ २९ जानेवारी पासून सहकार चळवळ जनक माजी केंद्रीय मंत्री स्व. डॉ धनंजय गाडगीळ यांना अभिवादन करून नागपूर ते विदर्भ, मराठवाडा आदी जिल्ह्यांतून सहकार दिंडी प्रवरानगर येथे ६ फेब्रुवारीस पोहोचेल तर दुसरी सहकार दिंडी ३० जानेवारी रोजी मुंबई येथील सहकार चळवळ जनक भारताचे माजी उपपंतप्रधान नामदार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला अभिवादन करून निघालेली सहकार दिंडी ६ फेब्रुवारीस प्रवरानगर येथे पोहोचेल यावेळी सहकार चळवळ जनक पद्मश्री स्व. विठ्ठलराव विखे यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर या दोन्ही दिंड्यांचा संगम होऊन एकच सहकार दिंडी शिर्डी कडे रवाना होणार आहे. यावेळी दि. ८ फेब्रुवारीस शिर्डी आंतरराष्ट्रीय पातळीवरील महाकुंभ सहकार परिषदेचे उद्घाटन माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या शुभहस्ते होईल यानंतर ५० आंतरराष्ट्रीय सहकार प्रतीनिधी,५० युवक , ५० महिला , ५० पतसंस्था वरिष्ठ अधिकारी समवेत संयुक्त बैठक होईल.

दि. ९ फेब्रुवारीस राज्यातील केंद्रीय सहकार मंत्री नामदार अमित शहा , महाराष्ट्र राज्य जलसंपदा मंत्री व आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहकार परिषदेचे स्वागताध्यक्ष नामदार डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री नामदार ॲड. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे आणि नामदार अजित पवार,सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आदी सहकार क्षेत्रातील मान्यवर मंत्री, वरिष्ठ अधिकारी याप्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाण्याचे निमंत्रण समक्ष भेटून दिलें आहे.

असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन चे खजिनदार आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखालील होणाऱ्या याआंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत जगातील सहकार क्षेत्रातील अमेरिका, थायलंड इंडोनेशिया , फिलीपिन्स, श्रीलंका कोरिया, मॉरिशस, नेपाळ या८ देश आणि कर्नाटक , गुजरात, केरळ, गोवासह महाराष्ट्र राज्यातील २० हजार नामवंत प्रमुख सहकार पतसंस्था प्रतिनिधी सक्रिय सहभागी होणार आहे.

परदेशातील सहकारी पतसंस्था चळवळ आणि भारतातील सहकारी पतसंस्था चळवळ संगमातून ह्या अभूतपूर्व आर्थिक व सहकार क्षेत्रातील १२ वर्षांनंतर च्या अद्वितीय महाकुंभ सहकार पतसंस्था मेळाव्यात जगातील सहकार चळवळ पार्श्वभूमी, भारतासह विविध देशांतील सहकारी पतसंस्था कामकाज पध्दती, कमकुवत व अडथळे आणणारे कुचकामी कायदे सर्वांगीण सहकार कायदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित कामकाज पध्दती व कायदे अंमलबजावणी बाबतीत आदानप्रदान, पतसंस्था विश्वासर्हता , ग्राहक मानसिकता , ठेवी संकलन, सुलभ कर्ज प्रामाणिक गरजूंना कर्ज वाटप आणि विनाविलंब कर्ज वसुली ,, सहकार चळवळ जनसहभाग, सहकारी संस्था कार्यक्षेत्रातील व्यावसायिक आणि आर्थिक परिस्थिती, सहकारी पतसंस्था पदाधिकारी व, अधिकारी, कर्मचारी यांचे बदलत्या शासकीय आणि स्थानिक बाजारपेठेतील बदलावर आधारित प्रशिक्षण, माहिती आदानप्रदान स्थानिक ते जागतिक पातळीवर सर्वस्तरावर नि विकसित होणाऱ्या परिस्थितीबाबत वैचारिक, आर्थिक ,सहकारी सम्रुद्र मंथनातून भारतीय सहकारी पतसंस्था प्रति निधींसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित प्रगतीची द्वारे खुली करणारी महापर्वणी ठरणार असून भारत देशातील सहकारी पतसंस्थांच्या एकजुटीचे दर्शन परदेशातील येणाऱ्या सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना घडविणार आहे.त्यामुळे महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधींनी या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेत सहभागी व्हावे असे कळकळीचे आवाहन नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष वसंत कवाद यांनी केले.

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि महाराष्ट्र शासन सहकार विभाग, असोसिएशन ऑफ एशियन कॉन्फडरेशन ऑफ क्रेडिट युनियन फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त शिर्डी येथे ९ फेब्रुवारी २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन केले आहे. या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या उपस्थितीत जिल्हा सहकारी बँकेच्या स्व.गुलाबराव शेळके सभागृहात सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न झाली. त्या वेळी ते बोलत होते.

महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट सोसायट्यांच्या प्रतिनिधींनी या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला उपस्थित राहून आपले योगदान द्यावे. तसेच अधिकाधिक प्रतिनिधींनी उपस्थित राहण्याचे आवाहन नाशिक विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष वसंत लोढा यांनी मनोगतातून व्यक्त केली.

तर फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को – ऑप. सोसायटी अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, राज्य फेडरेशनच्या वतीने २०१२ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष उत्साहात साजरे केले होते त्यानंतर २०२५ मध्ये पुन्हा एकदा शिर्डी येथे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींना आंतरराष्ट्रीय सहकार वर्षात सहभागी होण्याची संधी राज्य फेडरेशनने उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे केवळ अहिल्या नगर जिल्ह्यातील २ हजार पेक्षा अधिक प्रतिनिधी सहभागी होतील.अशी अपेक्षा व्यक्त केली.

या वेळी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन संचालक वासुदेव काळे, अहिल्यानगर जिल्हा स्थैर्यनिधी संघ संचालक शिवाजी आप्पा कपाळे, नामदेव थोरात, काकासाहेब लामखडे, भिवासेठ रसाळ, बाबाजी कळसकर, शांताराम कळसकर, कान्हूर पठार पतसंस्था चेअरमन सुशीला ठुबे, गुरुदत्त पतसंस्था चेअरमन लहू थोरात, पारनेर ग्रामीण पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष थोरात, नगराध्यक्ष नितीन अडसूळ, अर्जुन भालेकर, संभाजी औटी, चंद्रकांत लंके, सुदाम म्हस्के, संजय भगत, संपत निघुट, बंडू म्हस्के, दत्तात्रय औटी, संतोष तांबे, संजय औटी, बबन पावडे, निवृत्ती अडसरे आदीसह अनेक पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते


