Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

‌ऑनलाईन आणि प्रगत शहरातील भूलभुलैयाला भुलून वाढलेल्या खरेदीतील फसवणूकीने स्थानिक बाजारपेठ व ग्राहक उध्वस्त – आशिया खंड सहकारी पतसंस्था व क्रेडिट कॉन्फडरेशन युनियन ( ॲक्यु ) चे खजिनदार ओमप्रकाश तथा काका कोयटे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

ऑनलाईन आणि प्रगत शहरातील भूलभुलैयाला भुलून वाढलेल्या खरेदीतील फसवणूकीने स्थानिक बाजारपेठ व ग्राहक उध्वस्त – आशिया खंड सहकारी पतसंस्था व क्रेडिट कॉन्फडरेशन युनियन ( ॲक्यु ) चे खजिनदार ओमप्रकाश तथा काका कोयटे

दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगांव – अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित उद्योग, दळणवळणाची वेगवान साधने, इंटरनेट जलद सेवा आकर्षक जाहिराती, खरेदीतील प्रचंड आर्थिक बचत आमिष यामुळे युवा पिढी ऑनलाईन खरेदीला बळी पडल्याने ग्रामीण व शहरी स्थानिक उद्योजक उध्वस्त झाले आहे सर्वाधिक वाईट म्हणजे या खरेदीत फसवणूक टाळण्यासाठी अनंत अडचणी येतात. स्थानिक बाजारपेठेतील मंदीने प्रचंड बेकारी वाढून स्थलांतरित ओझ्याने महानगरे बकाल बनली असल्याची खंत आशिया सहकारी पतसंस्था व क्रेडिट कॉन्फडरेशन युनियन (ॲक्यु) संचालक , महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष समता सहकारी पतसंस्था अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे यांनी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ आणि कोपरगांव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन वतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्राहक सन्मान योजना २०२४ उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष पदावरून बोलताना व्यक्त केली.

कोपरगांव शहर व ग्रामीण भागातील स्थानिक बाजारपेठेत पथारी ते मॉल शो रूम मध्ये सर्वोत्तम माल ग्राहकांना कमीत कमी खर्चात मिळावा याच बरोबर स्थानिक पथारी ते मॉल शो रूमच्या व्यापाऱ्यांना स़ंघटीत करून कोरोना महामारीत रसातळाला गेलेली स्थानिक बाजारपेठ विकसित करण्यासाठी संघटनेचे सुधीर डागा , प्रदिप साखरे, राजकुमार बंब व पदाधिकारी परीश्रमातून कोपरगांव तालुका व्यापारी महासंघ आणि किराणा मर्चंट असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून सलगपणे कंबर कसली आहे. यांनी दिपावली निमित्ताने होणाऱ्या प्रचंड खरेदी विक्रीचा लाभ स्थानिक बाजारपेठेत व्यापारी आणि ग्राहकांना मिळवून देण्यासाठी ग्राहक सन्मान योजना दोन वर्षांपासून नियमबद्ध काटेकोर पद्धतीने राबविण्यात यश मिळवले आहे. या योजनेच्या तिसऱ्या यशस्वी वर्षांत किमान ६००प्रकारची बक्षीसे ठेवण्यात आली आहे. गत दोन वर्षांत पथारी व्यावसायिकांकडून २०रुपयाच्या पणत्या व लक्ष्मी (झाडू ,शिरई ) खरेदीतून हजारो रुपयांच्या दर्जेदार वस्तू ग्राहकांना बक्षिसरूपाने मिळाल्या आहेत. त्यावेळी व्यापारी आणि ग्राहकात चुरशीने कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याने ग्राहक व व्यापारी यांनी आनंदात दिवाळी साजरी केली.

या वर्षी ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या वाढत्या मागणीमुळे ग्राहक सन्मान योजना २०२४ राबविण्यात येत आहे याचा जास्तीत जास्त लाभ घेवून व्यापारी आणि ग्राहक यांनी कोपरगांव शहर व ग्रामीण बाजारपेठ सबल बनविण्यासाठी हातभार लावावा असे कळकळीचे आवाहन कोयटे यांनी केले.
यावेळी अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका सौ. चैताली काळे यांनी यावर्षी परमेश्वर कृपेने समाधान कारक पाऊस पडत आहे. केंद्र व राज्य शासनाने शेतकरी, महिला, वृद्ध, आदींना मोठ्या प्रमाणावर विविध स्वरूपात प्रत्येक कुटुंबात हजारो रुपये घरपोच दिलें आहे. आमदार आशुतोष काळे यांनी भुतो न भविष्यती हजारो कोटी रुपयांच्या विकास कामांचा धडाका सुरू केल्याने यावर्षी नागरीक समाधानी असल्याने दिपावली आनंदात साजरी केली जाईल सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रियदर्शनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. पुष्पा ताई काळे यांनी कोपरगांव ग्रामीण भागातील महिला संघटीत स्थानिक बाजारपेठेत रोजगार मिळवून देण्यासाठी गेली अनेक वर्षे महिला ग्राहक मेळावे दरवर्षी भरविले जातात. या मेळाव्याला मिळणारा प्रतिसाद व महिला ग्राहक व उद्योजक चेहऱ्यावरील हास्य पाहून आपण उत्तम रितीने काम करीत असल्याचे आम्हाला समाधान मिळते याच धर्तीवर ओमप्रकाश कोयटे यांच्या नेतृत्वाखालील ग्राहक सन्मान योजना निश्चितच स्वागतार्ह आहेत परंतु युवा पिढी, महिला यांनी ऑनलाइन खरेदीला बळी न पडता स्थानिक बाजारपेठेत दर्जेदार वस्तू खरेदी करून कोपरगांव ग्रामीण व शहरातील बाजार पेठेला आपला पैसा व्यवसाय वाढीसाठी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन केले.

याप्रसंगी संजीवनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका कोल्हे यांनी व्यापारी महासंघ आणि किराणा असोसिएशन यांनी पुढाकार घेत सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच चांगला आहे.सर्वच लहान मोठ्या व्यापारी बांधवांनी ऑनलाईन खरेदी करताना उपलब्ध असणाऱ्या बहुपर्यायी वस्तूंचे भांडार उपलब्ध ठेवले तर अधिक जास्त ही मोहीम यशस्वी करता येईल.महिला आणि युवकांमध्ये विश्वास निर्माण करून ग्राहक ऑनलाईन कडे वळणार नाही यासाठी कुठे काय उपलब्ध आहे याची माहिती अधिक प्रसारित झाल्यास बाजारपेठ गतिमान होण्यास मदत होईल.आपली बाजारपेठ आपला अभिमान हा विचार घेऊन पुढे जाण्याची गरज प्रतिपादन करुन गुन्हेगारीच्या घटना अलीकडे वाढल्या असून त्यामुळे बाजारपेठेवर त्याचा परिणाम होतो.त्यावर देखील कठोर कार्यवाही होऊन सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था उत्तम राहील याची दक्षता घेण्याची गरज आहे.महिला भगिनी गोळीबार,अपहरण,खून,चोऱ्या अशा घटनांनी घाबरतात त्याचा थेट परिणाम खरेदीवर होतो व बाहेर जाण्याऐवजी लोक ऑनलाईन पर्याय निवडतात यासाठी या घटना देखील रोखणे आवश्यक असल्याचे मत कोल्हे यांनी व्यक्त केले.

या उपक्रमात मोटारसायकल, टिव्ही, फ्रिज, मोबाईल, नथ, मिक्सर, ओव्हन,होम थिएटर, वॉशिंग मशीन, ट्रॉली बॅग यासारख्या ६०० लाखोंरुपयांची भरीव बक्षिसे ठेवण्यात आली आहे.खरेदी केल्यानंतर एक कूपन नाव आणि मोबाईल नंबर टाकून भरणे आवश्यक आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

यावेळी तहसीलदार महेश सावंत, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, मुख्याधिकारी सुहास जगताप, राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक माजी संचालिका सौ.चैतालीकाळे, संजीवनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा सौ रेणुका कोल्हे, कोपरगांव औद्योगिक वसाहत उपाध्यक्ष केशव भवर , माजी उपनगराध्यक्ष रविंद्र पाठक,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कृष्णा आढाव, शिवसेना शहरप्रमुख सनी वाघ, माजी नगरसेवक योगेश बागूल, माजी नगरसेवक मंदार पहाडे, माजी नगरसेवक बबलू वाणी,भरत मोरे मनसे जिल्हा उपप्रमुख संतोष गंगवाल ,महावीर सोनी, किरण शिरोडे, धीरज कराचीवाला हर्षल कृष्णाणी, गुलशन होडे,मानव शूक्ला कोपरगांव रील स्टार राशी शिंदे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन ट्रस्ट सचीव धरमचंद बागरेचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सुनील गंगुले, जेष्ठ धान्य व्यापारी अजित लोहाडे, जेष्ठ व्यापारी तुलसीदास खुबाणी,रमेश शिरोड़े, माजी माजी नगरसेवक जनार्दन कदम, विवेक सोनवणे,वैभव गिरमे,आशुतोष पटवर्धन, प्रीतम बंब, परेश उदावंत,चांगदेव शिरोडे यासह अनेक व्यावसायिक,व्यापारी महासंघाचे सर्व सदस्य पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे