Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न साकार संजीवनी पॉलीटेक्निक ही महाराष्ट्रातील विनाअनुदानित व राज्य संस्थांमधील पहिली ‘आटोनॉमस’ दर्जा प्राप्त संस्था – श्री नितीन कोल्हे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

कर्मयोगी शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न साकार संजीवनी पॉलीटेक्निक ही महाराष्ट्रातील विनाअनुदानित व राज्य संस्थांमधील पहिली ‘आटोनॉमस’ दर्जा प्राप्त संस्था – श्री नितीन कोल्हे

 

दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगांव :- संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासुन महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयाकडून ‘ऑटोनॉमस (स्वायत्तता)’ संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे संजीवनी पॉलीटेक्निक हे महाराष्ट्रातील ३५० पेक्षा अधिक विनाअनुदानित संस्थांपैकी ऑटोनॉमस दर्जा प्राप्त करणारे पहिले पॉलीटेक्निक ठरले आहे. या दर्जामुळे संजीवनी पॉलीटेक्निकचा दर्जा व गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याने कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या स्वप्नपूर्तीत आम्ही यशस्वी ठरतांना कर्मवीर भाऊराव पाटील पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयास उत्तम व्यवस्थापन कामगिरीतूनऑटोनॉमस दर्जा प्राप्त व सलग बारा वर्षे एनबीए मानांकन मिळवणारे संजीवनी ग्रामीण शिक्षण समूह संचलित संजीवनी ग्रामीण विद्यापीठ व संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालय अंतर्गत कर्मवीर भाऊराव पाटील पदविका अभियांत्रिकी महाविद्यालय हे एकमेव ठरले आहे. या कीर्तिमानांनी संजीवनी ग्रामीण शिक्षण संस्थेस राज्यातील एक अग्रेसर संस्था म्हणुन नावलौकिक प्राप्त झाला असल्याचे गौरवोद्गार संजीवनी ग्रामिण शिक्षण समूहाचे चे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे यांनी सत्कार प्रसंगी बोलताना काढले.

संजीवनीच्या या अभुतपूर्व यशाबद्धल संजीवनीचे अध्यक्ष श्री नितिन कोल्हे व श्री अमित कोल्हे यांनी प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख, डीन्स, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचे एका शानदार कार्यक्रमात अभिनंदन करून कौतुकाची थाप देतांना कार्यक्रमात बोलताना काढले.

यावेळी संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अमित कोल्हे म्हणाले की, संस्थेचे संस्थापक कर्मयोगी स्व. शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वावलंबी व्हावे, असे स्वप्न सुमारे ४२ वर्षांपूर्वी पाहीले आणि प्रथमतः कर्मवीर भाऊराव पाटील पदविका अभियांत्रिकी महाविद्यालय स्थापन केले. या माध्यमातून उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले पाहीजे, या संकल्पनेवर त्यांचा विशेष भर असायचा. त्यांच्या मार्गदर्षक तत्वांनुसार अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्याची फलनिष्पत्ती ग्रामीण विद्यार्थ्यांना नमांकित कंपन्यांमध्ये उच्चांकी नोकऱ्या मिळण्यास झाली. यापुढे तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाधिष्टित व उद्योगाभिमुख, अधिक कौशल्ये असणारा अभ्यासक्रमाचा समावेश करण्याची स्वायत्तता प्राप्त झाली आहे.

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणविस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्राकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील संस्थेला ऑटोनॉमस दर्जा देवुन एक नव्या दिशेने जाण्याची संधी दिली, याबद्दल या कार्यक्रमात श्री अमित कोल्हे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.
श्री नितिनदादा कोल्हे यांनी पुढे म्हटले आहे की ऑटोनॉमस संदर्भात आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआसीटीई), नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षणालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अंतिमतः महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षणालयाने ‘आटोनॉमस’ दर्जाची मोहर उमटविली.

ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झाल्यामुळे एखादा विद्यार्थी एखाद्या सत्रात एक किंवा अधिक विषयांमध्ये नापास झाला तर त्यांची लागलीच १५ दिवसात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वाया जाणारे वर्ष टळणार आहे. जसजसे तंत्रज्ञान बदलेल तसे अभ्यासक्रमात बदल करण्याची परवानगी मिळाल्याचे अध्यक्ष नितीन कोल्हे यांनी समारोपात सांगितले

1/5 - (1 vote)

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे