Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

संपूर्ण भारतातील जनतेची ऑनलाईन,आदी मार्गाने होणारी फसवणूक आणि लूट रोखण्यासाठी व्यापारी महासंघाच्या वन नेशन,वन वेट ,वन रेट ह्या जनहितकारी मागणीच्या कडक अंमलबजावणीसाठी संसद आणि विधिमंडळात सर्व आमदार खासदार मंत्री यांनी कायदा बनवून तो सर्वत्र दैशभर लागू करण्यात केंद्र व राज्य सरकारला भाग पाडावे – व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

संपूर्ण भारतातील जनतेची ऑनलाईन,आदी मार्गाने होणारी फसवणूक आणि लूट रोखण्यासाठी व्यापारी महासंघाच्या वन नेशन,वन वेट ,वन रेट ह्या जनहितकारी मागणीच्या कडक अंमलबजावणीसाठी संसद आणि विधिमंडळात सर्व आमदार खासदार मंत्री यांनी कायदा बनवून तो सर्वत्र दैशभर लागू करण्यात केंद्र व राज्य सरकारला भाग पाडावे – व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे

🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगाव : – भारतीय अर्थव्यवस्था आणि सक्षम व सुदृढ बनवण्यात देशातील सर्व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांबरोबर कोपरगाव तालुक्यातील व्यापारी वर्गाचा खारीचा वाटा नक्कीच आहे. अनेक समस्यांना सामोरे जात शहरी आणि ग्रामीण भागातील व्यापारी, छोटे – मोठे किराणा दुकानदार ग्राहकांना सेवा देऊन त्यांचा विश्वास मिळवत आहे. व्यापारी हा स्पर्धेच्या युगात स्पर्धा करायला तयार आहे. परंतु ऑनलाईन आदी मार्गाने जनतेची लूट आणि फसवणूक टाळण्यासाठी व्यापारी महासंघांच्या मागण्यांमधील प्रमुख जनहितकारी ‘वन नेशन, वन वेट, वन रेट’ ह्या मागणीचे संसदेसह देशातील विधान मंडळांमध्ये कायद्यात रूपांतर करून त्यांची कायमस्वरुपी देशभर कडक अंमलबजावणी करण्यासाठी सर्व थरांतील र्लोकप्रतिनिधींनी केंद्र व राज्य सरकारला भाग पाडावे याकरिता अहिल्या नगर जिल्ह्यातील सर्व लोक प्रतीनिधीसह नामदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार आशुतोष काळे, भाजप प्रदेश सचिव माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे,भाजप युवा नेते विवेक कोल्हे, नामदेवराव परजणे पाटील गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ अध्यक्ष राजेश परजणे यांनी देखील केंद्रीय गृहमंत्री नामदार अमित शहा मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार आणि उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने केंद्र व राज्य सरकारांना आमची मागणी मान्य करण्यासाठी आग्रह धरावा असे कळकळीचे आवाहन कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, एशियन पतसंस्था युनियन खजिनदार आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन व समता सहकारी पतसंस्था अध्यक्ष ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी केले.

काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली २५ मे जागतिक व्यापारी दिनानिमित्त कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ, कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन, युवा व्यापारी आघाडी, महिला व्यापारी आघाडी, कोपरगाव तालुका डीलर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य बाईक रॅली, ज्येष्ठ व्यापारी व नव उद्योजक सन्मान सोहळा आणि ग्राहक हक्क संरक्षण प्रबोधन कार्यक्रमात तालुक्यातील व्यापारी वर्गाला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, नामदेवराव परजणे गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेशआबा परजणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

काका कोयटे पुढे म्हणाले की कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी सावळी विहीर , शिर्डी भागातील अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित औद्योगिक वसाहत आणि समृद्धी महामार्गालगतच्या नवनगरात स्थानिक व्यापाऱ्यांना आपले उद्योग उभारण्यासाठी प्प्राधान्य द्यावे. त्या जागांमध्ये उद्योग उभारण्यासाठी व्यापारी महासंघ व्यापाऱ्यांना मार्गदर्शन करील. याशिवाय येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उद्योजक अथवा त्यांच्या प्रतीनिधीं, अधिकारी कामगार यांच्या निवारा व जनसंपर्क कार्यालयासाठी साठी स्थानिक बांधकाम व्यावसायिकांना प्राधान्य देवून विविध प्रकारच्या वसाहती निर्माण करण्यासाठी राज्य सरकारने सर्वप्रकारच्या सवलती द्याव्यात अशी मागणी यावेळी केली.

समृद्धी महामार्गामुळे कोपरगाव ते मुंबई च्या प्रवास ३ तासावर येणार आहे. याचे सादरीकरण विधानसभेत लोकप्रतिनिधींनी करावे. त्याचा फायदा कोपरगावकरांना कसा करून देता येईल यासाठी सहकार्य करावे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व तालुक्याचे आमदार आशुतोष काळे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोपरगाव शहर व तालुका विकासात व्यापारी महासंघ नेहमीच अग्रभागी आहे. त्यांचे उपक्रम हे नेहमीच व्यापारी व ग्राहकांच्या हिताचे असतात. व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यामध्ये मी देखील प्रामाणिकपणे प्रयत्न करून होणाऱ्या विधानसभेच्या अधिवेशनात व्यापारी महासंघाच्या मागण्या संदर्भात आवाज उठवेल. विशेषतः ‘वन नेशन, वन रेट, वन वेट’ या संकल्पने चे कायद्यात रूपांतर करण्यासाठी विशेष प्रयत्न करेल.असे आश्वासन दिले.

तालुक्यातील व्यापाऱ्यांच्या भव्य दिव्य स्वरूपाच्या बाईक रॅलीमध्ये २७० व्यापारी सहभागी झाले होते. या रॅलीत व्यापारी एकता जिंदाबाद, व्यापारी महासंघाचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देत कोपरगाव तालुक्यातील व्यापारी एकजुटीचे दर्शन घडविण्यात आले. शहरातील व्यापारी प्रमोद मुंदडा यांनी ‘व्यापारी महासंघाचा एकच ध्यास, गावाचा विकास’ अशा प्रकारचे गीत तयार करून बाईक रॅलीमध्ये या गीतामुळे एक जान आली होती. सर्व व्यापाऱ्यांमध्ये उत्साह पसरला होता. कोपरगाव तालुक्याची ओळख कॅलिफोर्निया अशी करण्यात ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले अशा १९ ज्येष्ठ व्यापाऱ्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर कोपरगाव तालुक्याची बाजारपेठ हलविण्यात जे महत्त्वपूर्ण योगदान देत आहे अशा ०९ नव उद्योजकांना कर्तृत्व गौरव पुरस्काराने सन्मानित केले.

जीवन गौरव प्राप्त ज्येष्ठ व्यापारी टेकचंद खुबानी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, व्यापारी महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार मिळाल्यामुळे आम्ही भारावून गेलो आहे. आमचा आयुष्यभर सन्मान केला गेला नाही, परंतु व्यापारी म्हणून जो जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला याचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे आमच्या कुटुंबियांचे देखील डोळे पाणवलेले आहेत.

तसेच ऑनलाइन ऑफलाइन यातील फरक कमी करण्यासाठी तालुक्यातील व्यापाऱ्यांसाठी समता नागरी सहकारी पतसंस्थे द्वारा महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनकडून ‘सहकार बास्केट’ या ऑनलाइन ॲपचे उद्घाटन आणि व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या कार्याची माहिती व मागण्यांचे निवेदन देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. कोपरगाव तालुका व्यापारी महिला आघाडी च्या अध्यक्षपदी राजश्री ताई गुजराथी यांची निवड करण्यात आली असून प्रसंगी माजी अध्यक्षा किरण दगडे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला.

व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धेच्या युगात व्यापार वाढीसाठी अमुलाग्र बदल होण्यासाठी ग्राहक हक्क संरक्षण व प्रबोधन करत ‘वन नेशन, वन वेट, वन रेट’ संकल्पना, ऑनलाइन खरेदीत होणारी ग्राहकांची फसवणूक याबाबत चित्रफितीच्या माध्यमातून सादरीकरण करत मार्गदर्शन केले. व्यापारी युवा आघाडीचे हर्षल कृष्णानी यांनी देखील चित्रफितीच्या माध्यमातून ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक कशाप्रकारे होते ? यावर प्रकाश टाकला.

सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सुधीर डागा यांनी चित्रफितीच्या माध्यमातून जे सादरीकरण केले ते वाखणण्याजोगे असून ते ग्राहकांसमोर देखील करणे महत्त्वाचे आहे त्यामुळे ग्राहक संरक्षण व जागृता मोठ्या प्रमाणात होईल. व्यापारी महासंघाचे उपक्रम, कार्यक्रम ग्राहक हिताचे असल्यामुळे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला अच्छे दिन येत आहे.

ब्लॅक आणि व्हॉट जमान्यापासून आजच्या डिजीटल जमानयापर्यंत अनंत अडचणीत व्यापार टिकविण्यासाठी जेष्ठ व्यापाऱ्यांनी केलेलें काबाडकष्ट निश्चित आम्हाला अभिमान स्पद प्रेरणादायी आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय अर्थव्यवस्थेने चवथ्या क्रमांकावर झेप घेतली यासाठी पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी, गृहमंत्री नामदार अमित शहा, मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशाला आर्थिक सबल बनविण्यात व्यापाऱ्यांचा खारीचा लहान वाटा असलातरी तो गौरवास्पद आहे.

आपल्या परिसरात नैसर्गिक पाणी टंचाई असून पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी आणणे हाच एकमेव पर्याय आहे यासाठी व्यापारी महासंघाने यासाठी राज्यभर जनप्रबोधनाठी शासन आणि जनदरबारात आवाज उठवावा व्यापारी , व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर रवीवारी व्यापारी संवाद बैठकीत व्यापाऱ्यांनी आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात.
आपसात अथवा विविध कार्यालयामार्फत समस्या सोडविणे करीता स्वतंत्र हेल्पलाईन महासंघाने सुरू करावी या सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही सहकार्य करु अशी ठाम ग्वाही विवेक कोल्हे यांनी दिली.

व्यापार म्हणून व्यापारात आधुनिकीकरणातील डिजिटल ऑनलाईन – ऑफलाईनला पर्याय नस‌ला तरी त्यामधील विसंगती ग्राहक व्यापाराती,ल मानसिकते मध्ये प्रसंगानुरूप होणारे,बदल , व्यापारातील चढ उतार , दरडोई उत्पन्न वाढीची गरज याबाबत सर्वांनी आत्मपरीक्षणातून आपसात एकसंघ रित्या बाजारपेठ मजबूतीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी योगदान देण्याची गरज आहे.
यावेळी प्रारंभी आज व्यापारी महासंघ ग्राहक सेवा हाच धर्म मानून ग्राहकांना येणाऱ्या अडचणी देखील सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. कोपरगाव शहरात महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृहे कमी आहेत ती वाढवावी. ज्या जागेवरून अतिक्रमण उठले आहे त्या जागेवर स्वच्छतागृहे व पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. अशी मागणी कोपरगाव तालुका किराणा मर्चंट असोसिएशन अध्यक्ष राजकुमार बंब यांनी प्रास्ताविकातून केली.

जीवन गौरव प्राप्त ज्येष्ठ व्यापाऱ्यांचा परिचय करून देत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यापारी महासंघ सचिव प्रदीप साखरे यांनी केले. या वेळी व्यापारी महासंघ कोषाध्यक्ष तुलसीदास खुबानी, कार्याध्यक्ष अजित लोहाडे, ज्येष्ठ संचालक आशुतोष पटवर्धन, नारायण अग्रवाल, कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहत उपाध्यक्ष केशवराव भवर, रमेश शिरोडे, विजय नानकर आदींसह तालुक्यातील व्यापारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संचालक महावीर सोनी, नारायण लांडगे, मानव शुक्ला, प्रीतम बंब, संदीप काबरा, किरण शिरोडे, उल्हास गवारे, संतोष गंगवाल, अतिश शिंदे आदींनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार युवा व्यापारी आघाडीचे धीरज कराचीवाला यांनी मानले.

1/5 - (1 vote)

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे