Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

कर्मयोगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या सकुशल संस्कारीत नेतृत्वाखालील बावनकशी मुशीत कोल्हे परिवारांच्या तीन पिढ्यांनी प्रामाणिक सहकाऱ्यांच्या परिश्रमाने जगाच्या पाठीवर चमकणारे हजारो तारे घडवून लाखो कुटुंबियांना नवसंजीवनी दिली – भाजप प्रदेश सचिव सौ.स्नेहलता कोल्हे

संपादक - अरुण आहेर

0 0 1 9 1 5

कर्मयोगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांच्या सकुशल संस्कारीत नेतृत्वाखालील बावनकशी मुशीत कोल्हे परिवारांच्या तीन पिढ्यांनी प्रामाणिक सहकाऱ्यांच्या परिश्रमाने जगाच्या पाठीवर चमकणारे हजारो तारे घडवून लाखो कुटुंबियांना नवसंजीवनी दिली – भाजप प्रदेश सचिव सौ.स्नेहलता कोल्हे

🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगांव : ज्ञान हा प्रत्येकाचा मौल्यवान दागिना आहे दहावी-बारावी शिक्षणानंतर अभियांत्रिकी तांत्रिक शिक्षणातुन जगाच्या पाठीवर चमकणारे हजारो तारे घडविण्यांचे काम करून लाखो कुटुंबियांना नवसंजीवनी देण्यासाठी कर्मयोगी आणि जेष्ठ माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या सकुशल संस्कारीत बावनकशी मुशीत आणि नेतृत्वाखाली कोल्हे परिवारांच्या तीन पिढ्यांनी प्रामाणिक सहकाऱ्यांच्या बळावर संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाच्या माध्यमांतुन लाखो कुटुंबियांना नव संजीवनी दिली असल्याचे गौरवोद्गार भाजपच्या प्रदेश सचिव आणि माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे यांनी काढले.

संजीवनी उद्योग समुह व संजीवनी ग्रामीण शिक्षण समूह संजीवनी ग्रामीण विद्यापीठ सहकार्याने तालुक्यातील दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मंगळवारी संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आला त्याप्रसंगी त्या अध्यक्षपदावरून बोलत होत्या.

याप्रसंगी कर्मयोगी आणि सहकार महर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेबरोबरच सरस्वती पुजन करण्यांत आले. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतुन तीस वर्षापासुन हा उपक्रम सुरू असल्याचे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक या कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

संजीवनी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. ए. जी. ठाकुर याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, तंत्रज्ञान वेगाने विकसीत होत असुन स्टार्टअप इंडियासह देश विदेशातील औद्योगिकीकरणांला कोणत्या पध्दतीचे अभ्यासक्रम हवे आहेत त्याचा पाया संजीवनी विद्यापीठात घातला जात आहे. मुला-मुलींना स्वतःच्या पायावर उभे राहण्यांचे शिक्षण येथे दिले जाते. दहावी बारावी नंतर काय याबाबत उच्च दर्जाचे मार्गदर्शन आणि ज्ञान शिकविले जाते.

प्रारंभी संजीवनी ग्रामीण विद्यापीठ अध्यक्ष अमित कोल्हे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्तविक करतांना म्हणाले की, कर्मयोगी सहकार आणि शिक्षण महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांनी भारतीय जनतेला दारिद्द्य्रतून मुक्त करण्यासाठी जागतिक पातळीवरील उच्च दर्जांच्या शैक्षणिक सुविधा युक्त पातळीवर रोजगार निर्मिती बरोबर देशातील स्थानिक युवक देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नोकरी , व्यावसायिक क्षेत्रातील स्पर्धेत कायमस्वरूपी अव्वल स्थानी रहाण्याकरिता संजीवनी ग्रामीण शिक्षण समूहाच्या विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून जागतिक स्तरावरील दर्जेदार शिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र संघर्ष करतांना ग्रामीण भागातील मुला मुलींना के. जी. पासुन पी. जी पर्यंत तसेच पी.एच. डी चे दर्जेदार शिक्षण मिळावे हे स्वप्न कर्मयोगी व जेष्ठ माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी पुर्णत्वास नेले आहे.

त्याच्या परिपुर्तीसाठी संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे, कोपरगांव तालुक्यातील पहिल्या आमदार सौ.स्नेहलता कोल्हे ,माझ्यासह संजीवनी सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे, सुमित दादा कोल्हे व सौ.मनाली कोल्हे आणि विविध थरांतील सहकाऱ्यांनी काळाच्या वेगाने पावले टाकत अचूकपणाने यातील संधी शोधल्याने जागतिक स्तरावरील नासा, इस्रो, टाटा, जीओ रिलायन्स यासह देश विदेशातील महत्वाच्या पदावर संजीवनीचा विद्यार्थी काम करीत आहे तसेच विविध माध्यमांतून आज पर्यंत किमान एक लाखावरील युवकांना कायमस्वरूपी रोजगार आणि उद्योग मिळवून देण्यात आम्ही यशस्वी ठरलो याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच गुणात्मक शिक्षणाला प्राधान्य देण्याचे कळकळीचे अमित कोल्हे यांनी आवाहन केले.

माजी आमदार सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, पालकांनी कष्ट घेवुन आपल्या पाल्यांना शिकविले. दहावी बारावीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम संपन्न होत आहे. उच्च शिक्षण घेतांना मुला-मुलींनी योग्य अभ्यासकम व शिक्षणसंस्था निवडुन वाटचाल करावी. आयुष्यात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकाला तडजोड करावीच लागते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी खेड्यापाड्यातील ग्रामिण भागातुन मातीशी नाळ जोडलेल्या कार्यकर्त्यांच्या मदतींने संजीवनीचे वैभव उभे केले आहे. सुज्ञ आणि तज्ञ पिढी येथे घडली जात आहे. भविष्य आणि आयुष्याला दिशा देण्यांचे काम संजीवनी अखंडपणे करत आहे. संकटाचा कितीही मोठा ढिगारा आला तरी त्यावर उभं राहुन शेवटपर्यंत आत्मविश्वास सोडु नका, विद्यार्थ्यांनी शिक्षणांतुन आपले आई वडील गुरूजन आणि तालुक्याचे नांव मोठे करावे.

याप्रसंगी संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे डॉ. एम . व्ही. नागरहल्ली , के.बी.पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए . आर . मिरीकर, डॉ. समाधान दहिकर आदि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार व सुत्रसंचलन प्रा. साहेबराव दवंगे यांनी केले.

1/5 - (1 vote)

दैनिक गणेश श्रद्धा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 9 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे