कोपरगांवकरांना सप्टेंबर अखेर पासून दिवसाआड पिण्याचे पाणी मिळणार – आमदार आशुतोष काळे
संपादक - अरुण आहेर


कोपरगांवकरांना सप्टेंबर अखेर पासून दिवसाआड पिण्याचे पाणी मिळणार – आमदार आशुतोष काळे

दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगांव – कोपरगांवकरांना गेल्या चाळीस वर्षापासून ४ ते २१ दिवसाआड पिण्याचे पाणी मिळत असल्याने या नागरिकांचे हाल मी आजोबा कर्मवीर शंकरराव काळे साहेब व माजी आमदार अशोकदादा काळे यांच्या निवडणूक प्रचारात, विविध निवडणुकीत सार्वजनिक कार्यक्रम प्रसंगी ऐकून, त्यांची दयनीय अवस्था पाहून त्याच वेळी मी अनेक वेळा मी कुठल्याही परिस्थितीत वाटेल ते कष्ट उपसून कोपरगांवकरांना पिण्याचे पाणी मिळवून देणार यांच्या खूणगाठी बांधीत परमेश्र्वराकडे साकडे घालीत असतांना परमेश्वराने जनतेकडून ही केवळ मला आमदार बनवले नाही तर अनंत संकटांवर मात करीत १३१ कोटी रुपये खर्चाच्या ५ व्या साठवण तलावाच्या खर्चात किमान ३० कोटी रुपयांच्या बचतीतून कोपरगांव करांना सध्याच्या पाणी पुरवठ्यात दुप्पटीने वाढ करणाऱ्या पिण्याचे पाणी साठवण क्षमतेचा तलाव बांधकाम पूर्णत्वास नेण्यासाठी माझे चिकाटीचे प्रयत्न यशस्वी ठरविले.

५ व्या नविन साठवण तलावात अतिरिक्त नविन पाणी उपलब्ध करून देण्यात आपणास जनता जनार्दनांची मिळालेली साथ, मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री नाम.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे, सर्व शासकीय मंत्री आमदार,अधिकारी , कर्मचारी कार्यकर्ते, नागरिक यांचे मला उत्तम सहकार्य मिळाल्याने अनंत संकटांवर मात करतांना कोर्टकचेरी जंजाळातून माझ्या पहिल्या आमदारकीच्या काळात मी कोपरगांव करांचे हाल दूर करण्यात यशस्वी ठरलो असून याकामी मला सहकार्य करणाऱ्यांचा मी शतशः ऋणी असल्याचे कळकळीचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केले.

या प्रसंगी बोलतांना आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले, मी आजोबा कर्मवीर शंकरराव काळे साहेब, माजी आमदार अशोकदादा काळे , व, विविध निवडणूकसहमाझ्या निवडणुक प्रचार कार्याबरोबर विविध प्रकारच्या कार्यक्रम प्रसंगी अनेक वेळा कोपरगांव शहरातील झोपडपट्टी, गावठाण, उपनगरातील जनतेशीमाझा कायमस्वरूपी संपर्क आला. यावेळी त्यांना ४ ते २१ दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यासाठी किमान ४ – ५ टाक्या घराबाहेर बिनभरोशे स्थितीत रस्त्यावर अतिक्रमण करून ठेवाव्या लागल्याने अरुंद रस्ते, शेजाऱ्याशी भांडणे, डास आजारी रूग्णांना अडथळ्यामुळे वेळेवर उपचार न मिळणेआदी रोगराई निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्यांमुळे जनता चाळीस वर्षापासून हलाखीचे जीवन जगत होती . याचमुळे सन २०१९ पुर्वी आपण ९ दिवसांचे उपोषण केले.

आमदारपदी निवड झाल्यावर सर्व प्रथम कोपरगांवकरांसाठी ५ व्या नविन पिण्याच्या पाण्याच्या साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी कंबर कसली, यावेळी समृद्धी महामार्गकरिता लागणारा मुरूम ,डबर या तलावाच्या खोदकामातून पुरविण्यास राज्य शासन, नगर परिषदेला भाग पाडले यामुळे नगरपरिषदेस ७ ते ८ कोटींचा फायदा झाला आहे . याचबरोबर ह्या योजनेच्या मंजूरीसाठी १५ % लोकवर्गणी भरण्यासाठी किमान २० कोटी नगर परिषदेला किमान १० वर्षे अनेक विकासात्मक कामांच्या खर्चाला कात्री लावून भरावी लागणार होती. यातच शेती व ग्रामीण भागातील पाणी कमी होईल या कारणासाठी ६ नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन अडथळे निर्माण केले तसेच भावी २५ वर्षातील लोक संख्या आणि उद्योगांना लागणारे अतिरिक्त पाणी मिळविण्यासाठी मला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.

सुदैवाने आपण ४० वर्षात अशक्य असलेले पुर्वीच्या १ ते ४ पाणी साठवण क्षमता असलेल्या तलावाइतक्या अतिरिक्त पाणी साठवण करणाऱ्या 5 व्या नविन पिण्याच्या पाण्यासाठी साठवण तलावात पाणीआणण्यात आपण यशस्वी झालो असून या पाण्याचे जलपुजन रविवारी दि.१५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता करण्यात येणार असून शहरातील सर्व आबालवृद्ध, महिला पुरुषांनी मंगलमय जलपुजनास उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी करून यानंतर किरकोळ नियोजनात्मक काम पूर्ततेनंतर सप्टेंबर अखेर पासून कोपरगांव करांना कायमस्वरूपी दिवसाआड निर्जंतुक व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळणार असल्याची ठाम ग्वाही समारोप प्रसंगी दिली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष सुनील गंगुले , माजी नगरसेवक, श्रीसाईतपोभुमीचे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.


